नवं वर्ष,नवी दृष्टी
नवीन वर्ष आणि सोमवार हे समीकरण एकदा जुळून आलं की मग आपला आनंद गगनात मावेनासा होतो. कोणतंही नवीन चांगलं काम करायला मी एक तारीख, सोमवार किंवा गुरुवार निवडतो. आणि समजा जर कॉम्बिनेशन आलंच तर मग काय दुधात साखरच.
आता आज मला नव्या उमेदीने काहीतरी सुरुवात करायचीय, कारण उद्या सोमवार पण आहे आणि एक जानेवारी पण. असं कॉम्बिनेशन दरवर्षी थोडंच येतं.
ह्या सोमवारी म्हणजे एक जानेवारीला दोन हजार अठरा या वर्षाचं स्वागत करताना एवढं नवं कोरं वर्ष त्या विधात्याने आपल्या झोळीत टाकल्या बद्दल सर्वप्रथम त्याचे आभार मानले पाहिजेत, नाही का?
कारण त्याने अजून पर्यंत तरी श्वास दिलाय म्हणूनच मी हे करू शकतोय.
आज माझ्या मनात घर करून राहिलेल्या सगळ्या प्रेरणाहीन, नकारात्मक व भीतीदायक अशा सैतानाला मारून काहीतरी नवं करायचं आहे, मानसिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्यावरची जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यास मला सज्ज व्हायचंय.
एकविसाव्या शतकातील या अठराव्या वर्षात पदार्पण करताना मी माझ्यात नक्कीच बदल घडवतोय, तयार होतोय येणारं आयुष्य झेलायला,अधिक मजबूत व ताकदवान होउन... स्वप्नं साकारायला, स्वप्नं बघायला आणि सदैव फ्रेश रहायला.
तुम्हाला सर्वाना नववर्षाच्या शुभेच्छा...
हॅपी न्यू इयर...
No comments:
Post a Comment