ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ही बातमी न्यूज च्यानेल वर आली आणि मन सुन्न झालं. एका जेष्ठ अभिनेता दिग्दर्शकाला रसिक कायमचे मुकले असं वाटून गेलं.
ही बातमी न्यूज च्यानेल वर आली आणि मन सुन्न झालं. एका जेष्ठ अभिनेता दिग्दर्शकाला रसिक कायमचे मुकले असं वाटून गेलं.
बेखुदी में सनम .....
एक था गुल और एक थी बुलबुल...
ओ मेरी शर्मिली.....
खिलते है गुल यहां...
नि सुलताना रे...
तुम बिन जाऊ कहां...
चंचल शीतल निर्मल...
घुंघरू कि तरह बजता ही रहा हुं ...
यासारखी किती तरी गाणी डोळ्यासमोर तरळून गेली जी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत.
शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरविषयी जेव्हाही चर्चा होते तेव्हा त्यांचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरील आणि पडद्यामागील यांच्या मैत्रीची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना, चाहत्यांना भावली.
‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘शान’, ‘त्रिशूल’, ‘सुहाग’, ‘दो और दो पांच’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका साकारली. त्याकाळी शशी आणि अमिताभ यांच्या जोडीला इतकी प्रसिद्धी मिळाली की दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट निर्मिती करण्यास उत्सुक असायचे.
अभिनय क्षेत्रातला चंद्र म्हणून कोणा अभिनेत्याचे नाव घ्यायचे असेल तर ते शशी कपूर यांचे घेतले पाहिजे. अभिनेता, निर्माता अशा भूमिका लिलया पेलत हा हरहुन्नरी कलाकार कायम सिनेमा व्यापत राहिला. आज हा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. एका मोठ्या प्रवासाला त्याची सुरुवात झाली आहे. सिनेसृष्टीच्या आकाशातून चंद्र निखळला आहे अशीच काहीशी भावना सिनेरसिकांच्या मनात आहे.
खरेतर अभिनयाचे बाळकडू शशी कपूर यांना घरातूनच मिळाले होते. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राज आणि शम्मी कपूर यांच्यासोबत शशी कपूर यांनीही अभिनय क्षेत्रातच करियर करायचे ठरवले. बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांनी १९४० पासून मोठ्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या ‘आग’ आणि ‘आवारा’ या दोन सिनेमांमध्येही त्यांनी सुरूवातीला काम केले. शशी कपूर म्हटले की स्मित हास्य करत आपल्या सहज अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता लोकांच्या समोर यायचा.
अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा वयाने मोठे असूनही शशी कपूर यांनी ‘दिवार’ सिनेमात त्यांच्या लहान भावाची भूमिका स्वीकारली. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अँग्री यंग मॅनला ‘मेरे पास माँ है’ असे शांत आणि संयतपणे सांगणारा त्याचा लहान भाऊ शशी कपूर यांनी ज्या ताकदीने साकारला त्याला जवाब नाही. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी फक्त दिवार सिनेमात नाही तर ‘सुहाग’, ‘त्रिशूल’, ‘नमकहलाल’, ‘सिलसिला’ ‘कभी कभी’ या सिनमांमध्येही बघायला मिळाली. सिनेमा अमिताभ यांच्याभोवती केंद्रीत असला तरीही शशी कपूर यांची भूमिका मात्र खास असायची. त्यांनाही बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये गर्दी करत असत. इतकेच नाही तर नलिनी जयंत, माला सिन्हा, तनुजा, नंदा यांसारख्या अभिनेत्रींपासून त्यांनी अगदी रेखा, राखी, नीतू सिंग यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. ‘जब जब फूल खिलें’ या सिनेमातील त्यांनी साकारलेली भूमिका आणि त्यातील गाणी चांगलीच गाजली.
त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा देखील त्यांच्या अभिनया इतकाच हिट विषय आहे. ‘खिलते हैं गूल यहाँ’, ‘घुंगरूकी तरह बजताही रहाँ हूँ मै’, ‘परदेसीयोंसे ना अखिया मिलाना’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ही आणि अशी अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली गेली. कपूर कुटुंबातील हॅण्डसम अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचा चार्म आणि त्यांच्या नुसत्या हसण्यानेच कित्येक तरुणी त्यांच्यावर फिदा होत्या. किंबहुना एक वेळ तर अशीही होती की, त्यांच्या चार्मसमोर रुपवान अभिनेत्रींचे सौंदर्यही फिके पडले होते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्रिकूटाने हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. पण, एक देखणा अभिनेता म्हणून तरुणींकडून शशी कपूर यांना विशेष पसंती मिळाली.
प्रेयसीवर प्रेम करण्याची त्यांची अनोखी पद्धत, नुसत्या हसण्याने तिचा राग कुठतच्या कुठे पळवण्याची त्यांची अदा आणि मोठ्या उत्साहात एखाद्या गाण्यावर थिरकण्याचा त्यांचा अंदाज आजही अनेकांच्या मनात घर करुन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत शशी कपूर यांच्या वाट्याला बरीच प्रसिद्ध गाणी आली. ‘ओ मेरी शर्मिली’पासून ते अगदी ‘खिलते है गुल यहाँ’ पर्यंतच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहणयाची संधी प्रेक्षकांना मिळाली.
‘वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ’, या गाण्यात शर्मिला टागोरसोबत फ्लर्ट करणाऱ्या शशीजींच्या अदा, ‘एक था गुल एक थी बुलबुल’ या गाण्यातून अनेकांच्या काळजाला भिडल्या. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील चमक आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणाऱ्या या अभिनेत्याची ही वैशिष्ट्ये चित्रपटसृष्टीत त्यांना वेगळं स्थान देऊन गेली. अशा या अभिनेत्याला विनम्र श्रद्धांजली ....
अलविदा शशिदा...
© प्रमोद जोशी
अलविदा शशिदा...
© प्रमोद जोशी